६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Clerk Typing Test अनुकंपा तत्वावर क्लार्क म्हणून नोकरी लागलेल्या कर्मचाऱ्याला तीन वेळा संधी देऊनही टायपिंग टेस्ट उत्तीर्ण होता आलं नाही. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करत त्याला शिपाई पदी नियुक्त केलं.
Clerk Typing Test

Clerk Typing Test

Esakal

Updated on

कनिष्ठ लिपिकाला तीन वेळा टायपिंग टेस्ट उत्तीर्ण होता न आल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई करत थेट शिपाई पदावर नियुक्ती केली. उत्तर प्रदेशातील बरेलीत ही करावई करम्यात आलीय. रेहान असं कारवाई झालेल्या लिपिकाचं नाव आहे. त्याला हिंदी टायपिंग परीक्षेत पास होता आलं नाही. तीन वेळा तो नापास झाला. शेवटी कनिष्ठ लिपिक असलेल्या रेहान खानची चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून पदावनती केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com