
सिमला : हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात ढगफूटी आणि महापुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दहावर पोचली आहे. गेल्या चोवीस तासांत पाच जणांचे मृतदेह सापडल्याने राज्यातील मृतांची संख्या वाढली. तसेच बेपत्ता ३४ जणांचा शोध सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.