Sikkim Rain News : सिक्कीममध्ये ढगफुटी; आठ जवान मृत्युमुखी; २३ बेपत्ता

सिक्कीममध्ये भारतीय लष्करावर आज आभाळ कोसळले
cloudburst  heavy rain in Sikkim Eight soldiers died 23 missing monsoon flood weather
cloudburst  heavy rain in Sikkim Eight soldiers died 23 missing monsoon flood weatherSakal

गंगटोक : सिक्कीममध्ये भारतीय लष्करावर आज आभाळ कोसळले. उत्तर सिक्कीममध्ये ल्होनाक लेक परिसरामध्ये झालेल्या ढगफुटीनंतर आलेल्या पुरात वाहून गेल्याने आठ जवान मृत्युमुखी पडले असून अन्य २३ जण बेपत्ता झाले आहेत. या ढगफुटीनंतर तिस्ता नदीच्या खोऱ्यामध्ये मोठा पूर आला होता.

अचानक आलेल्या पुरामुळे शेकडो वाहने वाहून गेली असून या राज्याला देशाशी जोडणारा ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-१०’ वाहून गेल्याने वाहतूक व्यवस्थाही विस्कळित झाली आहे. पान २ वर.. साधारणपणे बुधवारी रात्री दीडनंतर चुंगथांग येथील धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर येथील पूरस्थिती आणखीनच बिकट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गोलितार आणि सिंगताम भागातून पाच जवानांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले असून अन्य तिघाजणांची याच भागातून सुखरूप सुटका करण्यात यश आल्याची माहिती गंगटोकचे उप-विभागीय न्यायदंडाधिकारी महेंद्र छेत्री यांनी दिली. सिंगतम येथील इंद्रेनी पूल हा तिस्ता नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला असून राजधानी गंगटोकपासून तो तीस किलोमीटर अंतरावर होता. येथील अतिवृष्टीची तीव्रता पाहून राज्य सरकारने राज्यामध्ये आपत्ती घोषित केली आहे.

वाहने राड्यारोड्याखाली दबली

चुंगथांग धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतर नदीच्या पाणी पातळीमध्ये अचानक १५ ते २० फुटांची वाढ झाली होती, असे लष्कराचे प्रवक्ते ले. कर्नल. महेंद्र रावत यांनी सांगितले. पुराच्या पाण्यात चिखल आणि राडा-रोडा वाहून आल्याने लष्कराचे २३ जवान आणि त्यांची ४१ वाहने त्याखाली दबल्या गेली. तिस्ता नदीच्या पुराचा तडाखा दिकछू, सिंगतम आणि रांग्पो या शहरांना देखील बसला आहे.

पूरग्रस्त भागांत शाळा बंद

राज्यातील गंभीर पूरस्थिती लक्षात घेऊन मंगन, गंगटोक, पाक्योंग आणि नामच या जिल्ह्यांतील शाळा ८ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-१० च्या माध्यमातून सिक्कीम हे राज्य उर्वरित देशाशी जोडल्या गेले होते, आता हा महामार्गच वाहून गेल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

तिस्ता नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने उत्तर बंगाल आणि बांगलादेशलाही पुराचा इशारा देण्यात आला आहे. लँको जलविद्युत प्रकल्पाजवळील दोन पूल देखील तिस्ता नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे मंगळवारी रात्री कोसळल्याचे उघड झाले.

दिवसभरात

  • लोकांनी घेतला छावण्यांत आश्रय

  • मुख्यमंत्री तमांग यांच्याकडून परिस्थितीचा आढावा

  • पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्री तमांग यांच्याशी चर्चा

  • केंद्राकडून राज्याला मदतीची ग्वाही

  • पश्चिम बंगालमध्ये पावसाचा जोर; यंत्रणा सावध

  • सिंगतम जिल्ह्यात सातजणांना बुडताना वाचविले

  • ईशान्येकडील राज्यांना पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com