PM मोदींमुळे CM चन्नींना जाता आलं नाही सभेला; म्हणाले, 'अचानकच...'

PM मोदींमुळे CM चन्नींना जाता आलं नाही सभेला; म्हणाले, 'अचानकच...'

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यावरुन आता पुन्हा एकदा वाद झाला आहे. पंतप्रधानांच्या दौर्यामुळे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी होशियारपूरमध्ये राहुल गांधींच्या प्रचार सभेमध्ये सहभागी होऊ शकले नाहीयेत. चन्नी यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी नाकारली गेली. पंतप्रधानांच्या (PM Modi) सुरक्षेच्या कारणास्तव पंजाबमध्ये नो फ्लाईंग झोन घोषित करण्यात आला आहे. चन्नी यांना चंडीगडवरुन होशियारपुरला जायचं होतं. मात्र, त्यांना जाता आलं नाही. या संपूर्ण घटनाक्रमाबाबत बोलताना मुख्यमंत्री चन्नी यांनी म्हटलंय की, राजाकारणामुळेच त्यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यांनी म्हटलंय की, त्यांना प्रचाराला जाऊ न देणं योग्य नाहीये. (Punjab Assembly Election 2022)

PM मोदींमुळे CM चन्नींना जाता आलं नाही सभेला; म्हणाले, 'अचानकच...'
'ज्याला पंतप्रधानांना सुरक्षा देता आली नाही, तो काय...' अमित शहांची चन्नींवर टीका

Chandigarh| I was in Una at 11 am but suddenly permission to fly (to Hoshiarpur) was denied due to PM Modi's movement, it was declared a no-fly zone. I was not able to attend Rahul Gandhi's rally in Hoshiarpur. I had permission to land: Punjab CM Charanjit Singh Channi

याबाबत बोलताना मुख्यमंत्री चन्नी यांनी म्हटलंय की, मी उनामध्ये सकाळी 11 वाजता होतो. मात्र, अचानकपणे होशियारपुरला जाण्यासाठी माझ्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणाची परवानगी रद्द करण्यात आली. नो फ्लाय झोन जाहीर करण्यात आला. त्यामुळे मला होशियारपुरमधील राहुल गांधींच्या सभेला उपस्थिती लावता आली नाही. मला लँड करायची परवानगी होती, असं त्यांनी म्हटलंय.

जाखड यांनी साधला निशाणा

या संपूर्ण प्रकरणी सुनील जाखड यांनी होशियारपुरमधील सभेमध्ये म्हटलंय की, मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी येणं नियोजन बद्ध होतं मात्र, लज्जास्पद बाब ही आहे की, त्यांना परवानगी नाकारण्यात आली. जर निवडणूक आयोग याची दखल घेत नसेल तर मी असं समजेन की निवडणूक आयोग एक दिखावा आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी म्हटलं होतं की, जेंव्हा ते पंजाबमध्ये आले होते तेंव्हा त्यांना फिरोजपूरला जाऊ दिलं नाही तसेच त्यांच्या जीवाला धोका होता. मात्र, आज जेंव्हा चरणजीत सिंग चन्नी यांना होशियारपुरला येण्यापासून रोखलं जात आहे, तेंव्हा मी मोदी साहेबांना विनंती करु इच्छितो की त्यांनी यावरही जरा प्रकाश टाकावा.

PM मोदींमुळे CM चन्नींना जाता आलं नाही सभेला; म्हणाले, 'अचानकच...'
Inflation : सर्वसामान्यांना दिलासा! घाऊक महागाईचा दर १२.९६ टक्क्यांवर

नेमकं काय घडलं होतं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फिरोजपूर दौरा सुरक्षेतील मोठ्या त्रुटींमुळे रद्द करण्यात आला होता. गृह मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं होतं की, काही आंदोलकांनी रास्ता रोको केल्यामुळं पंतप्रधान 15-20 मिनिटे फ्लायओव्हरवर अडकले होते. (PM Modi Security Breach) या गंभीर सुरक्षेतील त्रुटींची दखल घेत गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला होता. एवढेच नाही तर भाजपने सत्ताधारी काँग्रेस सरकारवर पंतप्रधानांच्या कार्यक्रमात घोळ आणि सुरक्षेत मोठी कुचराई केल्याचा आरोप केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com