
सोनू सूदची बहिण पंजाब काँग्रेसमध्ये; आमदारकीच्या तिकीटाची शक्यता
चंडीगड: सिने अभिनेता सोनू सूद गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच चर्चेत आहे. सोनू सूदने कोरोना काळात स्थलांतरित कामगारांना केलेली मदत चांगलीच चर्चेस पात्र ठरली होती. सोनू सूद आणि त्याची बहिण मालविका सूद या दोघांनीही आज पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांची भेट घेतली आहे. ही भेट सोनू सूदच्या मोगामधील घरातच झाली आहे. पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय उलथापालथी घडत आहेत. सोनू सूदला एका वर्षापूर्वी निवडणूक आयोगाकडून पंजाबचा 'स्टेट आयकॉन' म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात सोनू सूदची पंजाबचा 'स्टेट आयकॉन' म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली होती. मात्र, कुटुंबातील एक सदस्य आगामी विधानसभा निवडणूक लढवत असल्याने स्वेच्छेने राजीनामा दिल्याचं सोनू सूदने सांगितले होते.
सोनू सूदची बहिण मालविका सिंग यांनी आज औपचारिक रित्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि पंजाब काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आज सोमवारी दुपारी मोगामध्ये आले. यावेळी त्यांनी मालविका सिंग यांना पक्षात अधिकृत रित्या प्रवेश दिला. मालविका सूद यांना मोगामधून काँग्रेस पक्षाद्वारे उमेदवार म्हणून मैदानात उतरवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे मालविका सिंग यांच्या या संभावित उमेदवारीला विरोध देखील सुरु झाला आहे. काँग्रेसचे सध्याचे आमदार हरजोत कमल यांनी याचा विरोध केला आहे.
Web Title: Cm Charanjit Channi Visits Moga Actor Sonu Sood Sister Malvika Sood May Get Congress Ticket From Moga
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..