
एखाद्या राज्यात कार्यक्रमासाठी मोठी सजावट केली जाते. वेगळी अशी व्यवस्था केली जाते. कार्यक्रम झाला की त्या सजावटीचा कचऱ्यात समावेश होतो. तर काही वेळा अशी ठिकाणी रिकामी केली जातात. पण उत्तराखंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय खेळाच्या मैदानांबाबत असे होणार नाही.
उत्तराखंडमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या यशानंतर सरकारने नवी योजना आखली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मुख्य सचिव आनंद बर्द्धन यांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या ठिकानांना तसेच ठेऊन ते राज्यातील खेळाडुंसाठी वापरण्याचा आदेश दिला आहे.