esakal | 'दारिद्र्य कमी करण्यासाठी कुटुंब नियोजन करा'; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मुस्लिमांना आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Himanta Biswa Sarma

आसाममधील भाजपचे सरकार समाजातील महिलांना शिक्षित करण्याच्या दिशेने कार्य करेल, जेणेकरून ही समस्या प्रभावीपणे सोडविता येईल.

'दारिद्र्य कमी करण्यासाठी कुटुंब नियोजन करा'; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मुस्लिमांना आवाहन

sakal_logo
By
वृत्तसंस्था

गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी गुरुवारी (ता.१०) अल्पसंख्याक समुदायाला म्हणजेच मुस्लिमांना एक आगळंवेगळं आवाहन केलं आहे. देशातील गरिबी हटविण्यासाठी लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कुटुंब नियोजनाचे धोरण अवलंबण्याचा आग्रह त्यांनी केला आहे. आसाममधील नव्या भाजप सरकारला एक महिना पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाषणात हा मुद्दा उपस्थित केला. समाजातील सर्व घटकांनी पुढे येऊन समाजातील दारिद्र्य कमी करण्यासाठी सरकारला पाठिंबा द्यावा, असंही सरमा म्हणाले. (CM Himanta Biswa Sarma urged minority community to adopt ‘decent family planning policy’ for poverty reduction)

"सरकार सर्व गरीब लोकांचे रक्षणकर्ता आहे, परंतु गरिबी, निरक्षरता आणि योग्य कौटुंबिक नियोजनाचा अभाव हे लोकसंख्या वाढीचा मुद्दा सोडविण्यासाठी अल्पसंख्यांक समाजाच्या पाठिंब्याची गरज आहे," असं सरमा म्हणाले. आसाममधील भाजपचे सरकार समाजातील महिलांना शिक्षित करण्याच्या दिशेने कार्य करेल, जेणेकरून ही समस्या प्रभावीपणे सोडविता येईल.

हेही वाचा: सहा महिन्यात २०० कोटी डोस; नड्डांनी सांगितला भाजपचा रोडमॅप

सरमा पुढे म्हणाले की, सरकार मंदिर आणि वन भूमींवर अतिक्रमण करण्यास परवानगी देऊ शकत नाही. अल्पसंख्यांक समुदायाच्या सदस्यांनीही या जमिनींवर अतिक्रमण नको, अशी ग्वाही सरकारला दिली आहे. अल्पसंख्यांक समुदायाच्या नेत्यांना आत्मनिरीक्षण करण्याचा आणि लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी इतरांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

दरम्यान, हिमंता बिस्वा सरमा यांनी नुकतीच आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. याआधी ते सोनोवालप्रणीत सरकारमध्ये शिक्षण आणि आरोग्यमंत्री होते. शिक्षणमंत्री असताना सरमा यांनी राज्यात मदरसे बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

(Edited by : Ashish N. Kadam)

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.