esakal | मोदींनी सांगितली 'कोरोना कर्फ्यू'ची योग्य वेळ; मायक्रो कटेंन्मेट झोनवर लक्ष्य देण्याचं राज्यांना आवाहन 
sakal

बोलून बातमी शोधा

modi

देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठक घेतली. यावेळी त्यांनी विविध सूचना केल्या. 

मोदींनी सांगितली 'कोरोना कर्फ्यू'ची योग्य वेळ; मायक्रो कटेंन्मेट झोनवर लक्ष्य देण्याचं राज्यांना आवाहन 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना कर्फ्यूची नवी वेळ सांगितली आहे. या वेळेत कोरोनाबाबत जनजागृतीसाठी हा कर्फ्यू पाळण्याचं आवाहनही मोदींनी राज्यांना केलं आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठक घेतली. यावेळी त्यांनी विविध सूचना केल्या. 

मोदी म्हणाले, "आपल्याला माक्रो कटेंन्मेट झोनवर लक्ष्य केंद्रीत करावं लागेल. त्याचबरोबर ज्या ठिकाणी नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यासाठी कोरोना कर्फ्यू हा शब्द प्रयोग वापरावा अशी सूचना मी करेन. हा कोरोना कर्फ्यू रात्री ९ किंवा १० ते पहाटे ५ किंवा ६ वाजेपर्यंत लावणे योग्य ठरेल" 

मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, कोरोनाच्या चाचण्यांवर जास्तीत जास्त भर द्या. या चाचण्या करताना ७० टक्के RT-PCR चाचण्या हे आपलं टार्गेट आहे. सध्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या उच्च पातळीवर पोहोचली आहे पण जास्तीत जास्त चाचण्या करा. यासाठी नेमके नमुने घेणंही तितकचं महत्वाचं आहे. योग्य प्रशासनाद्वारे याची तपासणी केली जाऊ शकते, असंही मोदींनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सुचवलं.

११ ते १४ एप्रिल हा काळ 'लस उत्सव' म्हणून साजरा होणार

आपल्या चर्चेदरम्यान आपण मृत्यूदराचा प्रश्न उपस्थित केला होता. हा मृत्यूदर कमीत कमी कसा राखता येईल याचा आपण विचार करायला हवा. रुग्णांच्या आजारांबाबत आपल्याकडे नेमकी माहिती असायला हवी. याचीच आपल्याला त्यांचा जीव वाचवण्यास मदत होईल. दरम्यान, ११ ते १४ एप्रिल हा काळ आपण 'लस उत्सव' म्हणून साजरा करुयात, असं आवाहनही यावेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सर्वांना केलं.   

loading image