KCR | मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाख,'या' राज्याची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाख,'या' राज्याची घोषणा

मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाख,'या' राज्याची घोषणा

sakal_logo
By
ओमकार वाबळे

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकरी आंदोलनात मारले गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आंदोलनात ज्या शेतकऱ्यांनी आपली माणसं गमावली त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाख रुपयांची भरपाई देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच त्यांनी केंद्र सरकारला कोणत्याही अटीशिवाय पीडितेच्या कुटुंबाला २५ लाख रुपये देण्याची विनंती केली आहे.

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केलेल्या या मोठ्या घोषणेची माहिती त्यांचे सुपूत्र केटीआर यांनी ट्विट करून दिली. ते राज्यात मंत्री आहेत. त्यांनी ट्विट केलं की, गेल्या एका वर्षात अनेक शेतकरी कुटुंबांनी कृषी कायद्यांविरोधात लढताना आपले लोक गमावले आहेत. तेलंगणा सरकारने या आंदोलनात प्राण गमावलेल्या सुमारे 750 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी विनंतीही त्यांनी केलीय.

तेलंगणा सरकारमधील मंत्री केटीआर म्हणाले की, आता केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले आहेत, त्यांनी शेतकऱ्यांवर दाखल केलेले खटले बिनशर्त मागे घ्यावेत. यासोबतच शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना केंद्रानेही आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केलीय.

भाजपची गोची?

तेलंगाणासारख्या लहान राज्याने दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहात त्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. केंद्रातील मोदी सरकारने फक्त कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. अद्याप याबद्दल अंमलबजावणी झाली नाही. वर्षभरापासून दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्राने आर्थिक मदतही जाहीर केलेली नाही. उलट आंदोलनकर्त्यांवर खटले दाखल केले आहेत. त्यामुळे मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांचा रोष आहे.

loading image
go to top