cm pushkar singh Dhami
sakal
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी नुकताच अल्मोडा जिल्ह्याचा दौरा केला, जिथे त्यांनी आपल्या साधेपणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ताडीखेतमधील जैनोली येथे आयोजित एका बहुउद्देशीय शिबिरात मुख्यमंत्री धामी यांनी सुरक्षेचा सर्व प्रोटोकॉल बाजूला सारून थेट एका 'मुख्य सेवक' नावाच्या स्टॉलमध्ये बसून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या.