Rajasthan CM: इकडे वसुंधरा राजेंची घेतली भेट, दुसरीकडे दिल्लीहून नड्डांचा फोन... लवकरच सुटणार राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा

राजस्थानातही छत्तीसगड, मध्य प्रदेश पॅटर्न राबवणार; मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत कुणाची नावं?
Rajasthan CM
Rajasthan CMEsakal

मध्य प्रदेश, छत्तीसगडनंतर आता राजस्थानमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? याकडे संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने नव्या चेहऱ्यांना नेतृत्वाची संधी दिली आहे. राजस्थानमध्ये हाच पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज दुपारी चार वाजता होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.(Latest Marathi News)

राजस्थानची लढाई भाजपने जिंकली, पण मुख्यमंत्री कोण होणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. भाजप पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वसुंधरा यांच्याकडे सोपवणार? किंवा राजस्थानात हिंदुत्वाचे पोस्टर बॉय बनलेले बाबा बालकनाथ यांच्याकडे सत्ता सोपवली जाईल किंवा गजेंद्र शेखावत यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवली जाईल. याशिवाय सीपी जोशी, दिया कुमारी, राजवर्धन राठौर ही नावेही शर्यतीत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता आहे. (Marathi Tajya Batmya)

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने सर्वांना आश्चर्यचकित केले. मध्य प्रदेशात बड्या चेहऱ्यांना डावलून मोहन यादव यांच्याकडे कमान सोपवण्यात आली, तर छत्तीसगडची धुरा विष्णुदेव साईं यांच्याकडे सोपवण्यात आली. अशा स्थितीत राजस्थानमध्ये काय होणार हा प्रश्न आहे. मध्य प्रदेश-छत्तीसगडच्या धर्तीवर राजस्थानही नव्या चेहऱ्यावर संधी देणार की पुन्हा एकदा वसुंधरा राजेच मुख्यमंत्री होणार, याची चर्चा जोरात सुरू असून, सस्पेन्सही कायम आहे.

Rajasthan CM
Sharad Pawar Birthday: शरद पवारांचे 84व्या वर्षात पदार्पण; राजकीय विरोध विसरून PM मोदींनी दिल्या शुभेच्छा!

राजस्थानमध्ये आज विधिमंडळ पक्षाची बैठक आहे. केंद्राने राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे यांना राजस्थानचे निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. तिन्ही नेते जयपूरला पोहोचले आहेत. राजनाथ सिंह यांची वसुंधरा राजे यांची भेट घेतली आहे. दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही राजनाथ यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे.(Latest Marathi News)

मुख्यमंत्री पदासाठी राजस्थानमधील भाजपच्या नव्या आमदारांचा सल्ला घेतील. यानंतर भाजप हायकमांडच्या मान्यतेनंतर आज मुख्यमंत्री पदाची घोषणा होणार आहे. बैठकीपूर्वी भाजप आमदार काळूराम मेघवाल यांनी वसुंधरा राजे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला. (Marathi Tajya Batmya)

Rajasthan CM
Mahua Moitra : मोईत्रांनी मागितली सर्वोच्च न्यायालयात दाद

छत्तीसगड आणि मध्यप्रदेश प्रमाणेच भाजपने राजस्थानमध्येही मुख्यमंत्री चेहरा नसताना निवडणूक लढवली होती. या निवडणुकांमध्ये भाजपने पीएम मोदींच्या नावावर विजय मिळवला. राजस्थानमधील 200 पैकी 199 जागांवर झालेल्या मतदानात भाजपने मोठा विजय मिळवला आहे. पक्षाला 115 जागा मिळाल्या आहेत. त्याचवेळी काँग्रेसने 69 जागा जिंकल्या.

दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे यावेळीही मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. जयपूरमध्ये त्यांनी 60 हून अधिक भाजप आमदारांची भेट घेतली आहे. त्याचबरोबर त्यांनी दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही भेट घेतली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांबाबतचा निर्णय संसदीय पक्ष घेईल, असे भाजपने स्पष्ट केले आहे.

Rajasthan CM
Weather Update: उत्तर भारतात थंडीची लाट; कोकणासह 'या' भागात आजही पावसाची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com