मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी शिवराजसिंह चौथ्यांदा विराजमान 

वृत्तसंस्था
बुधवार, 25 मार्च 2020

चौहान यांनी एका ओळीचा विश्वासदर्शक ठराव सभागृहात मांडला. उपस्थित सदस्यांनी तो आवाजी मतदानाने मंजूर केला. या वेळी सभागृहात काँग्रेसचा एकही सदस्य उपस्थित नव्हता.

भोपाळ : सत्तानाट्यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी चौथ्यांदा मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ सोमवारी (ता. २३) घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली मांडलेला आज विधानसभेत मांडलेला विश्वासदर्शक ठराव भाजप सरकारने आवाजी मतदानाने जिंकला. 

कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या हातातून हे राज्य भाजपकडे गेले. राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनला आज सुरुवात होताच चौहान यांनी एका ओळीचा विश्वासदर्शक ठराव सभागृहात मांडला. उपस्थित सदस्यांनी तो आवाजी मतदानाने मंजूर केला. या वेळी सभागृहात काँग्रेसचा एकही सदस्य उपस्थित नव्हता. भाजपचे ज्येष्ठ आमदार जगदीश देवडा यांनी विधानसभेचे अध्यक्षपद भूषविले. ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी भाजपने त्यांच्या सर्व आमदरांना व्हिप बजावला होता. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बहुजन समाज पक्षाचे दोन आमदार, समाजवादी पक्षाचा एक आमदार आणि सुरेंद्रसिंह शेरा व विक्रमसिंह राणा या दोन अपक्ष आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाव्या वेळी भाजपच्या बाजूने कौल दिला. मध्य प्रदेश विधानसभेत चार अपक्ष आमदार आहे. मात्र ठरावाच्या वेळी दोन आमदार गैरहजर होते. 

राज्यातील भाजप सरकारवरील विश्वासदर्शक ठराव एकमताने मंजूर झाल्यानंतर देवडा यांनी सभागृह शुक्रवारी (ता. २७) सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब केले. 

विश्वासदर्शक ठराव्याच्या वेळी सभागृहात काँग्रेसचा एकही सदस्य उपस्थित नसणे हे पक्षातील अलोकशाहीवादाचे लक्षण आहे. 
शिवराजसिंह, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश 
 

आजच्या विश्वासदर्शक ठरावाला काहीही महत्त्व नाही. ज्या २४ विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी राजीनामे दिले आहेत, तेथे होणाऱ्या पोटनिवडणुकीनंतरच भाजप सरकारने विश्वासदर्शक ठराव मांडालया हवा. 
पी. सी.शर्मा, काँग्रेस आमदार, मध्य प्रदेश 

विधानसभेतील सध्याचे बलाबल - 
२३० - एकूण सदस्य संख्या
 १०७  - भाजप
९२ - काँग्रेस
२४ - रिक्त जागा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Shivraj Singh Chouhan wins trust vote