'दोन हजार निष्पाप लोकांचे प्राण गेले, गुजरात हत्याकांडावेळी मोदींनी राजीनामा दिला का?' मुख्यमंत्र्यांचा भाजपला थेट सवाल
Siddaramaiah Statement, Bengaluru Stampede : २००२ च्या गुजरात दंगलीमध्ये सर्व धर्मांच्या सुमारे दोन हजार निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला होता का?
बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपला प्रत्युत्तर देत चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीसंदर्भात (Bengaluru Stampede) आमचे राजीनामे मागण्यापूर्वी अशाच घटनांमध्ये राजीनामा दिलेल्या नेत्यांची यादी जाहीर करण्याचे आवाहन केले.