esakal | उद्धव ठाकरे आज दिल्लीत; महत्त्वाच्या नेत्यांची घेणार भेट
sakal

बोलून बातमी शोधा

उद्धव ठाकरे आज दिल्लीत; महत्त्वाच्या नेत्यांची घेणार भेट

काँग्रेस आमदारांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट

उद्धव ठाकरे आज दिल्लीत; महत्त्वाच्या नेत्यांची घेणार भेट

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सोनिया गांधी यांची भेट घेत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची भेट दुपारी 12 वाजता होणार आहे. त्यानंतर ते सायंकाळी 6 वाजता सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे हे सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याने राज्यातील राजकारणातून विविध चर्चा सुरु आहेत. मात्र, उद्धव ठाकरे-सोनिया गांधी यांची ही भेट महाविकास आघीडीतील समन्वय राखण्यासाठी असल्याचे सांगितले जात आहे. 

काँग्रेस आमदारांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट

राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख आमदारांनी दोन दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे त्यांची भेट घेणार आहेत. 

निर्भया बलात्कार प्रकरणात आता निवडणूक आयोगाची एन्ट्री

भेटीकडे सर्वांचे लक्ष

उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदी आणि सोनिया गांधी  यांची भेट घेणार असल्याने त्यांच्या या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.