CM योगींमुळे जातीवाद, घराणेशाही संपली - अमित शहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah

CM योगींमुळे जातीवाद, घराणेशाही संपली - अमित शहा

उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांच्या सभा आणि कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे. सत्ताधारी भाजप पुन्हा एकदा राज्यात आपली सत्ता यावी यासाठी दंड थोपटून मैदानात उतरलेला दिसतो आहे. त्यातच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे आज उत्तर प्रदेशमध्ये आहे. यावेळी त्यांनी योगी आदित्यनाथ सरकारच्या कामांचं कौतुक केलं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आझमगडमध्ये सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करताना योगीजींनी जातीवाद, घराणेशाही आणि तुष्टीकरणाचं राजकारण संपवल्याचं संपवल्याचं विधान केलं. उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना ते म्हणाले की, 2015 पूर्वी उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था देशात 6 व्या क्रमांकावर होती आणि आज ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. बेरोजगारीचा दर 4.1% पर्यंत कमी झाला. तसेच 40 वैद्यकीय महाविद्यालये आहेत, वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागा 3800 वर गेल्या आहेत.

हेही वाचा: कंगना रणौत म्हणाली, मी माझा 'पद्म श्री' पुरस्कार परत करेन पण....

दरम्यान, भाजप सरकारच्या कामाची माहिती देताना, आम्ही JAM- J म्हणजेच J फॉर जन धन खाते, A फॉर आधार कार्ड, M फॉर मोबाईल फोन आणले असंही त्यांनी सांगितलं. तर समाजवादी पक्षावर टीका करत त्यांनी "एसपीनेही एक JAM आणल्याचे म्हणत, त्यांचे 'J फॉर जिना, A फॉर आझम खान आणि M फॉर मुख्तार'. आहे असे सांगितले. पूढे बोलताना त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आणि म्हणाले की, जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसे अखिलेश यांना जीनामध्ये एक महान व्यक्ती दिसत आहे.

loading image
go to top