Holi Festival Uttar Pradesh : गोरखपूरमध्ये गुलाल आणि फुलांची उधळण! CM योगींच्या उपस्थितीत निघाली भक्त प्रल्हादाची शोभायात्रा; पाहा कसं रंगलं शहर?

Gorakhpur Holi Celebration : गोरखपूरमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भक्त प्रल्हादाची भव्य मिरवणूक आणि होलिका दहन सोहळा उत्साहात पार पडला; 'विरासत कॉरिडॉर'मधील फुलांच्या होळीने आणि पारंपरिक लोकनृत्यांनी संपूर्ण शहर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले आहे.
Gorakhpur Holi Celebration

Gorakhpur Holi Celebration

esakal

Updated on

CM Yogi Adityanath celebrates Holi : गोरखपूरमध्ये होळीच्या पारंपरिक उत्सवाचा उत्साह सोमवारी शिगेला पोहोचला. 'पांडेयहाता' येथे आयोजित होलिका दहन उत्सव आणि भक्त प्रल्हादाच्या भव्य मिरवणुकीने संपूर्ण शहर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले. या सोहळ्याला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थिती लावल्याने कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढली.

'विरासत कॉरिडॉर

गोरखपूरच्या 'विरासत कॉरिडॉर'मध्ये पहिल्यांदाच हा सोहळा इतक्या भव्य स्वरूपात पार पडला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः भक्त प्रल्हादाची आरती केली आणि फुलांच्या होळीने मिरवणुकीचा शुभारंभ केला. यावेळी 'जय श्रीराम' आणि 'भक्त प्रल्हाद की जय'च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

व्यापाऱ्यांकडून जल्लोषात स्वागत

विस्थापित व्यापाऱ्यांचे पुनर्वसन केल्याबद्दल सर्व व्यापाऱ्यांनी शंखनाद करत आणि गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करत मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत केले. मिरवणूक पुढे सरकत असताना संपूर्ण रस्ता अबीर-गुलाल आणि फुलांच्या सुगंधाने दरवळून गेला होता. ठिकठिकाणी कलाकारांनी पारंपरिक लोकनृत्ये आणि गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com