
Yogi Adityanath
sakal
शारदीय नवरात्रीच्या महानवमीच्या पवित्र दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखनाथ मंदिरात गोरक्षपीठाच्या परंपरेनुसार कन्या पूजन केले. त्यांनी मातृशक्तीबद्दल आदर आणि श्रद्धा व्यक्त करत, नऊ दुर्गा स्वरूपाच्या बालिकांचे पाय पाण्याने धुतले. त्यानंतर त्यांनी त्यांचे पूजन केले, आरती केली, त्यांना नवीन वस्त्र (चुनरी) अर्पण केले, भेटवस्तू आणि दक्षिणा दिली आणि स्वतःच्या हाताने जेवणही वाढले.