संतांच्या हत्यावरून ट्विटरवॉर; योगींचे राऊतांना जोरदार प्रत्युत्तर

वृत्तसंस्था
Wednesday, 29 April 2020

'बुलंदशहरमधल्या मंदिरात दोन संत साधूंची हत्या झाली आहे. या विषयाचं कोणी पालघरप्रमाणे राजकारण करू नये. देश कोरोनाशी लढत आहे. शांतता राखा. आदित्यनाथ गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील,' असा टोला संजय राऊत यांनी ट्विटरवरून हाणला होता. या ट्विटला योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

लखनौ : उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधल्या मंदिरात दोन साधूंची हत्या करण्यात आल्यानंतर राजकारण तापलं आहे. 'बुलंदशहरमधल्या मंदिरात दोन संत साधूंची हत्या झाली आहे. या विषयाचं कोणी पालघरप्रमाणे राजकारण करू नये. देश कोरोनाशी लढत आहे. शांतता राखा. आदित्यनाथ गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील,' असा टोला संजय राऊत यांनी ट्विटरवरून हाणला होता. या ट्विटला योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचं राज्य आहे. कायदा तोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाते. बुलंदशहर घटनेनंतर काही तासांमध्येच आरोपींना अटक करण्यात आली. तुम्ही महाराष्ट्र सांभाळा, उत्तर प्रदेशची चिंता करु नका', असं ट्विट योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. 'पालघरमध्ये झालेल्या संतांच्या हत्येबाबत चिंता व्यक्त करण्याला राजकारण म्हणणाऱ्या संजय राऊत यांच्या दृष्टीबद्दल काय बोलणार? तुमचं हे वक्तव्य म्हणजे तुमच्या बदलत्या राजकीय संस्काराची ओळख करुन देत आहे. हे तुष्टीकरणाचं प्रवेशद्वार आहे, यात शंका नाही,' अशी टीकाही आदित्यनाथ यांनी केली आहे.

दोन साधूंची हत्या; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

'संजय राऊत यांना संतांची हत्येवर चिंता व्यक्त करणं राजकारण वाटतं? उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला, कारण पालघरमधले साधू निर्मोही आखाड्याशी संबंधित होते. राजकारण कोण करत आहे?' असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी विचारला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cm Yogi Adityanath Responds Sanjay Raut And Shivsena On Issue Of Bulandshahar