Coal India has announced a ₹1.10 lakh Performance Linked Reward for eligible non-executive employees ahead of Diwali 2026.
esakal
कोल इंडिया लिमिटेड (CIL) आणि तिच्या उपकंपन्यांमधील नॉन-एक्झिक्युटिव्ह कोळसा कामगारांसाठी दिवाळीपूर्वी मोठी घोषणा करण्यात आली आहे. पात्र कर्मचाऱ्यांना यंदा १ लाख १० हजार २५० रुपयांचा परफॉर्मन्स लिंक्ड रिवॉर्ड (PLR) देण्यावर व्यवस्थापन आणि प्रमुख कामगार संघटनांमध्ये एकमत झाले आहे. या निर्णयाचा लाभ जवळपास २ लाख कोळसा कामगारांना होणार आहे.
कोलकाता येथे शनिवारी झालेल्या कोल इंडिया ॲपेक्स संयुक्त सल्लागार समितीच्या (JCC) बैठकीत बोनसच्या रकमेवर अंतिम निर्णय घेण्यात आला. कोल इंडियाचे चेअरमन बी. साई राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत व्यवस्थापनासह प्रमुख कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.