Coal Scam: विजय दर्डा-देवेंद्र दर्डा पितापुत्रांना चार वर्षांचा कारावास; दिल्ली विशेष न्यायालयाचा निकाल

Vijay Darda
Vijay DardaEsakal
Updated on

Coal Scam Case : कोळसा घोटाळा प्रकरण दिल्लीच्या विशेष न्यायालयाने छत्तीसगडमधील कोळसा खाणी वाटपाच्या प्रकरणात काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांना मोठा दणका दिला आहे. या प्रकरणी न्यायालयाने आज (बुधवारी) विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली.

Vijay Darda
IT Return 2023: जास्त कर भरताय? आयकर कायद्यात कर वाचवण्याचे आहेत मार्ग, कोणते ते जाणून घ्या

विजय दर्डा यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयाने 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा तसेच यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणात चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. (latest marathi news)

याच प्रकरणात न्यायालयाने माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन ज्येष्ठ लोकसेवक केएस क्रोफा आणि केसी सामरिया यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाने विजय दर्डा आणि इतरांना कलम 120 बी, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले आहे.

Vijay Darda
Kirit Somaiya: 'तो व्हिडिओ खराच पण..' किरीट सोमय्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, अशी असेल पुढील तपासाची दिशा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.