esakal | "...म्हणून कोळसा टंचाई निर्माण झाली"; केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

"...म्हणून कोळसा टंचाई निर्माण झाली"; केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्टीकरण

"...म्हणून कोळसा टंचाई निर्माण झाली"; केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्टीकरण

sakal_logo
By
सुधीर काकडे

देशावर सध्या कोळशाच्या तुटवड्याचे संकट ओढावले असून, या संकटामुळे सध्या अनेक राज्य अंधारात जाण्याची भिती निर्माण झाली आहे. कारण कोळशाअभावी देशातील 17 राज्यातील 135 वीज केंद्रापैकी 46 विज निर्मिती केंद्र क्रिटिकल व 45 केंद्र सुपर क्रिटिकल कंडिशन मध्ये आहे. याच परिस्थितीवर आज देशाचे कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी कोळसा संकटाच्या कारणांची माहिती दिली, तसेच देशात सोमवारी विक्रमी कोळसा पुरवठा झाला असून, कोल इंडिया आणि कोळसा मंत्रालय देशाची मागणी पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असल्याचेही सांगितले आहे..

हेही वाचा: स्विस बँकेतील भारतीय खातेदारांची तिसरी यादी जाहीर

सप्टेंबर महिन्यात कोळसा खाणींच्या आसपास मुसळधार पाऊस पडल्याने, खाणीतून कोळसा काढण्याची आणि पुरवठा करण्याची प्रक्रिया खंडित झाली. ज्यामुळे कोळशाचं संकट निर्माण झाली असल्याची माहिती केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. आंतरराष्ट्रीय किंमती 60 रुपयांवरून 190 रुपये प्रति टन वाढल्या. त्यानंतर, आयात केलेले कोळसा उर्जा प्रकल्प एकतर 15-20 दिवस बंद असतात किंवा खूप कमी उत्पादन करतात. यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असंही त्यांनी सांगितलं.

loading image
go to top