पोलिसाचा किसिंग व्हिडीओ व्हायरल झाला अन्.. | Police | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police

पोलिसाचा किसिंग व्हिडीओ व्हायरल झाला अन्..

Coimbatore कोईम्बतूर शहर सशस्त्र राखीव पोलिसांशी संलग्न असलेल्या एका २९ वर्षीय कॉन्स्टेबलला व्हायरल झालेल्या किसिंग व्हिडीओमुळे निलंबित करण्यात आलं. शनिवारी ही कारवाई करण्यात आली. संबंधित कॉन्स्टेबलच्या गालावर एक महिला किस करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे असभ्य वर्तनाच्या आरोपाखाली निलंबनाची कारवाई करण्यात आली.

व्ही बालाजी असं या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव असून ते पोलिस भर्ती स्कूल (पीआरएस) कॅम्पसमधील पोलिस क्वार्टरमध्ये पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. “शुक्रवारी संध्याकाळी, बालाजी हे वलनकुलम तलावाजवळील उद्यानात मेहुणीशी गप्पा मारत होते, तेव्हा तिने अचानक त्यांच्या गालावर किस केलं. त्यावेळी बालाजी हे गणवेशात होते. कोणीतरी हळूच त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना पाठवला,” अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली.

शनिवारी सकाळी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. "घटनेच्या वेळी बालाजी गणवेशात असल्याने पोलिस उपायुक्त मुरलीधरन यांनी शनिवारी निलंबनाची कारवाई केली", असं अधिकारी पुढे म्हणाले.

loading image
go to top