esakal | "मोदींशी साम्य असल्यास योगायोग समजावा"; 'आप'नं शेअर केला 'मुन्नाभाई'चा व्हिडिओ

बोलून बातमी शोधा

Coincidence if it is similar to Modi says Aap and shared a video of Munnabhai}

गुजरातमधील मोटेरा येथील सरदार वल्लभभाई स्टेडिअम या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडिअमला  आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. यामुळे देशात खळबळ माजली असून विरोधी पक्षांकडून टीकाटिपण्णी केली जात आहे.

"मोदींशी साम्य असल्यास योगायोग समजावा"; 'आप'नं शेअर केला 'मुन्नाभाई'चा व्हिडिओ
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

गुजरातमधील मोटेरा येथील सरदार वल्लभभाई स्टेडिअम या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडिअमला  आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. यामुळे देशात खळबळ माजली असून विरोधी पक्षांकडून टीकाटिपण्णी केली जात आहे. दरम्यान, आम आदमी पार्टीनं टीका करताना अभिनेता संजय दत्तची प्रमुख भूमिका असलेल्या मुन्नाभाई एमबीबीएस या सिनेमाची एक छोटी व्हिडिओ क्लीप शेअर केली असून त्याला याच्याशी मोदींचं साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा असं कॅप्शन दिलं आहे.
 

आपनं शेअर केलेल्या या व्हिडिओत मुन्नाभाई आणि त्याचा सहकारी सर्किट हे दोघे पोलीस कोठडीत  असताताना स्वप्न रंगवत असतात. यामध्ये एक दिवस मुन्नाभाईचे सर्वत्र पुतळे, रस्त्यांना नावं, नोटांवर फोटो, शाळेच्या पुस्तकांमध्ये मुन्ना आणि सर्किटच्या मैत्रीचे धडे, मुन्नाच्या वाढदिवसाला सार्वजनिक सुट्टी आणि त्यामुळे बँक हॉलिडे असेल अशी चर्चा त्यांच्यामध्ये सुरु असते.

हा व्हिडिओ आम आदमी पार्टीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला असून त्याला कॅप्शन देताना याचं मोदींशी साम्य असल्यास निव्वळ योगायोग समजावा असं म्हटलं आहे. तसेच व्हिडिओखाली मेटेरा क्रिकेट स्टेडिअम असा हॅशटॅगही दिला आहे. 

भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव मोटेरा स्टेडिअमला देण्यात आलं होतं. पण आता या स्टेडिअमचे नाव बदलण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. तसेच या स्टिडिअमधील बॉलिंग एंडला रिलायन्स एंड आणि अदाणी एंड अशी नावं देण्यात आली आहे. यामुळे सरदार पटेल यांचे चाहते आणि देशभरातील क्रिकेटप्रमींनी संताप व्यक्त केला आहे.