
श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात सर्वाधिक थंडीचा काळ सुरू झाल्यानंतर थंडीच्या लाटेची तीव्रताही वाढली आहे. त्यामुळे, खोऱ्यात ऊर्जा विभागासह इतर आवश्यक सेवांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी जम्मूतील सर्व कार्यक्रम रद्द करून श्रीनगरमध्येच थांबण्याचा निर्णय जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुला यांनी घेतला.