
बोगोटा : पहलगाम हल्ल्याला भारताने दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये पाकिस्तानमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करणारे विधान कोलंबियाने मागे घेतले. भारतीय शिष्टमंडळाने पाकिस्तानकडून दहशतवादाला कायम पाठिंबा असल्याचे स्पष्ट केल्यानंतर हे विधान मागे घेतले. सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी ही माहिती दिली. कोलंबियाचे उपपरराष्ट्रमंत्री रोसा व्हिलाविसेन्सिओ यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर विधान मागे घेतल्याचे थरूर यांनी स्पष्ट केले.