
दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीर राज्यातील पहलगाम येथे निष्पाप भारतीयांच्या केलेल्या निर्दयी हत्येनंतर संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्याचं उत्तर म्हणून भारतानं 'ऑपरेशन सिंदूर' अमलात आणलं आणि ७ मे रोजी पीओकेत एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांना निशाणा बनवण्यात आलं. साखरझोपेत असणाऱ्या दहशतवाद्यांना यमसदनी पाठवणाऱ्या या मोहिमेची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानंतर त्या दोघीही सगळीकडे चर्चेत होत्या. मात्र कर्नल सोफिया यांची पणजी राणी लक्ष्मीबाई यांच्या सेनेत होती ही गोष्ट अनेकांना ठाऊक नाही.