
मुख्यंमत्री पुष्कर सिंह धामी शुक्रवारी भराडीसैण, गैरसैण इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येच्या कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमावेळी त्यांनी परदेशी पाहुणे, राजकीय नेते, सुप्रसिद्ध योगाचार्य यांचे स्वागत त्यांनी केले.यावेळी पाहुण्यांना प्रतीक चिन्ह आणि उत्तराखंडची प्रसिद्ध टोपी देण्यात आली.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मेक्सिको, फिजी, नेपाल, सूरीनाम, मंगोलिया, लातविया, श्रीलंका आणि रूस देशांचे राजदूत आणि अधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी ते म्हणाले की, देवभूमी उत्तराखंड योग आणि आयुषची वैश्विक राजधानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ येथील मातीतून हे दशक उत्तराखंडचे दशक असल्याचे सांगितले. त्यांचे हे शब्द आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत.