
भारतातील ओमिक्रॉन रूग्णांमधील 'या' लक्षणांमुळे संसर्गाचा धोका
नवी दिल्ली : दक्षिण अफ्रिकेत (South Africa Variant ) आढळलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने (Omicron Variant ) संपूर्ण जगात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. मात्र, भारतात ओमिक्रॉनची लागण होणाऱ्या रूग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीयेत. (Asymptomatic omicron cases in india) त्यामुळे ही सर्वाधिक चिंतेची बाब असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू शकतो असे जाणकारांचे मत आहे. याबाबत आजतकने वृत्त प्रकाशित केले आहे.
हेही वाचा: ओमिक्रॉन डेल्टापेक्षा घातक नाही, सध्याचे व्हॅक्सिन प्रभावी - WHO
दरम्यान, ओमिक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Variant) संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत असल्यामुळे सहाजीकच चाचण्यांचे प्रमाण कमी होते. त्याशिवाय लक्षणे नसल्याने लागण झालेली व्यक्ती इतरांपासून वेगळी राहत नाही. त्यामुळे गंभीर लक्षणे दर्शविणाऱ्या स्ट्रेनच्या तुलनेत सौम्य लक्षणे असलेल्या या स्ट्रेनचा संसर्ग वेगाने पसरू शकतो, असे मत शास्त्रज्ञांचे आहे.
डोंबिवलीच्या रूग्णाला डिस्चार्ज
महाराष्ट्रात डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात (Omicron First Patient found in maharashtra ) ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. त्याचा रिपोर्ट आता निगेटिव्ह (maharashtra first Patient covid reports comes negative ) आला असून, त्याला रूग्णालयातून घरी सोडण्यात आले असून, घरी सात दिवस विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
ओमिक्रॉनच्या रूग्णांमध्ये केवळ दोनच लक्षणे
ओमिक्रॉनचे बहुतांश रुग्ण हे असिम्प्टमॅटिक (Asymptomatic) म्हणजेच कोणतीही लक्षणे नसलेले आहेत. तर, ओमिक्रॉनच्या एका रुग्णामध्ये नाक गळणे आणि घशात खवखव याव्यतिरिक्त कोणतेही लक्षण दिसलेले नसल्याचे दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर सुरेश कुमार यांनी सांगितले.
Web Title: Common Things In Omicron Patients In India
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..