Farmers Protest : पराभवाच्या भीतीने आंदोलन मोडून काढले; केंद्र सरकार-पंजाब सरकारच्या हातमिळवणीचा काँग्रेसचा आरोप
Farmers Protest Crackdown in Punjab: पंजाबच्या शंभू आणि खनौरी सीमेवरचे शेतकरी आंदोलन केंद्र व पंजाब सरकारच्या हातमिळवणीमुळे मोडून काढल्याचा काँग्रेसने आरोप केला आहे. आप सरकारने पोटनिवडणुकीतील पराभव टाळण्यासाठी आंदोलन संपवले असल्याचा दावा आहे.
नवी दिल्ली : पंजाबच्या शंभू आणि खनौरी सीमेवरचे केंद्र सरकारविरुद्धचे शेतकऱ्यांचे आंदोलन केंद्र आणि पंजाब सरकारने हातमिळवणी करून मोडीत काढल्याचा आरोप आंदोलक करीत आहेत.