'जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांना भाजप प्रदेशाध्यक्ष करा'

वृत्तसंस्था
Monday, 26 August 2019

काश्‍मीर खोऱ्यातील सद्यःस्थितीवर भाष्य करताना नायब राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले होते. सध्या राज्यामध्ये औषधे आणि जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा नसून सरकारने दूरध्वनी सेवेवर निर्बंध घातल्यानेच शेकडो लोकांचे प्राण वाचल्याचा दावा त्यांनी केला आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल सत्यपाल मलिक हे सध्या करत असलेल्या वक्तव्यांवरून त्यांनी आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनावे, अशी टीका काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे.

काश्‍मीर खोऱ्यातील सद्यःस्थितीवर भाष्य करताना नायब राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले होते. सध्या राज्यामध्ये औषधे आणि जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा नसून सरकारने दूरध्वनी सेवेवर निर्बंध घातल्यानेच शेकडो लोकांचे प्राण वाचल्याचा दावा त्यांनी केला आहे. जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम रद्द करण्यात आल्यानंतरच्या दहा दिवसांमध्ये कुठलाही हिंसाचार झाला नाही, असा दावा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

याविषयी बोलताना चौधरी म्हणाले, की जम्मू काश्मीरच्या राज्यपालांना भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडण्यात यावे. कारण, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी केलेली वक्तव्ये ही भाजप नेत्यांसारखीच आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Adhir Ranjan Chowdhury attacks Jammu and Kashmir governor Satyapal Malik