राहुल गांधी यांच्यामुळे कॉंग्रेसचे 'केजरीवालकरण'

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील केलेल्या टीकेमुळे संतप्त झालेल्या भाजपने प्रत्युत्तर देताना राहुल गांधींमुळे कॉंग्रेसचे "केजरीवालकरण' झाल्याचा टोला लगावला. कॉंग्रेस पक्ष आपल्याच जाळ्यात अडकला असून, राहुल गांधींनी खोटे बोलणे थांबवावे, अशीही टीका भाजपने केली आहे.

भाजपचे सरचिटणीस श्रीकांत शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर उलटवार केला. ""राहुल गांधीच चोरांची मदत करत आहेत. मद्यसम्राट विजय मल्ल्याला बेल आऊट पॅकेज कॉंग्रेसच्या सत्ताकाळात मिळाले. दिवाळखोरी जाहीर करूनही त्याला दीड हजार कोटींचे कर्ज का दिले,'' असा सवाल श्रीकांत शर्मा यांनी केला.

राहुल गांधी जनतेची दिशाभूल करत आहेत. व्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहाराची चौकशी राहुल गांधींच्या घरापर्यंत पोचल्याने ते बिथरले आहेत. टू जी स्पेक्‍ट्रम गैरव्यवहारात मोठा मलिदा कोणाला मिळाला, असा खोचक प्रश्‍न करताना भाजप नेते श्रीकांत शर्मा म्हणाले, की नोटाबंदीत झालेल्या मृत्यूंचे भाजपला दुःख आहे; पण आताही हा पक्ष मरणाचे राजकारण करतो आहे. कॉंग्रेसची सत्ता असलेल्या दहा वर्षांत दररोज 695 शेतकऱ्यांची आत्महत्या होत होती. कॉंग्रेसने सत्तेच्या हव्यासातून देशाचे विभाजन होऊ दिले.

संसद का चालू देत नाहीत?
"सरकारने शेतकऱ्यांसाठी पीकविमा योजना आणली. एवढेच नव्हे, तर दोन वर्षांत दोन वेळा शेतीमालाची किमान आधारभूत किंमत वाढविली. राहुल गांधींकडे पुरावे असतील तर ते संसदेत का बोलत नाहीत आणि संसद का चालू देत नाहीत? राहुल गांधींनी खोटे बोलून सरकारवर दबाव आणणे बंद करावे. कॉंग्रेस पक्ष आपल्याच जाळ्यात अडकला आहे ही वस्तुस्थिती आहे,'' असे टीकास्त्र भाजपचे सरचिटणीस श्रीकांत शर्मा यांनी सोडले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress becomes Kejriwalkaran