गळफास लावून आत्महत्या केलेल्या रोहितच्या आईची राहुल गांधींनी घेतली गळाभेट; म्हणाले, माझ्या संघर्षाचं.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Jodo Yatra Rahul Gandhi Latest Update

राहुल गांधी सध्या पक्ष मजबूत करण्यासाठी भारत जोडो यात्रा करत आहेत.

गळफास लावून आत्महत्या केलेल्या रोहितच्या आईची राहुल गांधींनी घेतली गळाभेट; म्हणाले, माझ्या संघर्षाचं..

Bharat Jodo Yatra Latest Update : राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या पक्ष मजबूत करण्यासाठी भारत जोडो यात्रा करत आहेत. सध्या तेलंगणात भारत जोडी यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू आहे. या दौऱ्यात राहुल गांधी दररोज वेगवेगळ्या समुदायातील लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेताहेत.

राहुल गांधींच्या या प्रसंगाचा व्हिडिओही काँग्रेसकडून वेळोवेळी काढला जात आहे. यापूर्वी त्यांनी तेलंगणामधील आदिवासी समाजातील लोकांसोबत आदिवासी नृत्य केलं होतं. दरम्यान, मंगळवारी त्यांनी रोहित वेमुलाच्या आईचीही भेट घेतली.

हेही वाचा: 'How's The Josh'! विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधींची पळण्याची 'शर्यत'; कार्यकर्त्यांत उत्साह वाढवणारा Video समोर

रोहित वेमुलाच्या (Rohit Vemula) आईला भेटल्याचा फोटो स्वतः राहुल गांधींनी ट्विट केलाय. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय, 'रोहित वेमुला सामाजिक भेदभाव आणि अन्यायाविरुद्धच्या माझ्या संघर्षाचं प्रतीक आहे आणि राहील. रोहितच्या आईला भेटून प्रवासाच्या ध्येयाच्या दिशेनं पडलेल्या पावलांना नवं धाडस आणि नवी ताकद मिळाली.'

हेही वाचा: आता Elon Musk स्वत: ट्विटरचे CEO बनणार; सर्व संचालक मंडळ बरखास्त!

तेलंगणानंतर भारत जोडी यात्रा महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होणार आहे. राहुल गांधींनी 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून पदयात्रेला सुरुवात केली होती. 30 सप्टेंबरला गुंडलुपेट मार्गे कर्नाटकात प्रवेश केला. पक्ष मजबूत करणं हा यात्रेचा उद्देश आहे. या यात्रेमुळं 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फायदा होईल, असा पक्षाला विश्वास आहे.

हेही वाचा: AAP च्या मंत्र्याला संरक्षण रक्कम म्हणून दिले तब्बल 10 कोटी; तुरुंगात असलेल्या चंद्रशेखरच्या दाव्यानं खळबळ

रोहित वेमुलाची वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या

रोहित वेमुला हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात पीएचडीचा विद्यार्थी होता. वेमुलानं 17 जानेवारी 20216 रोजी वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनं संपूर्ण देश हादरला. AVBP कार्यकर्त्यांनी वेमुलाचा छळ केल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. त्यामुळं त्यानं हे पाऊल उचललं. या घटनेमुळं मोदी सरकारवरही सडकून टीका झाली आणि मोदी सरकारवर दलितविरोधी राजकारण केल्याचा आरोपही करण्यात आला.

टॅग्स :Rahul GandhiCongress