
नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार तिसऱ्या कार्यकाळातील पहिला वर्धापन दिन उद्या (ता. ९ जून) साजरा करणार असताना काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुली पत्रकार परिषद घेण्याचे आव्हान दिले आहे. तसेच उत्फूर्त पत्रकार परिषद घेण्याचे धाडस पंतप्रधानांमध्ये नसल्याचे म्हणत त्यांना डिवचलेही आहे.