
भाजप लोकांना भीतीच्या वातावरणात जगण्यास भाग पाडतेय : सोनिया गांधी
उदयपूर : राजस्थानमधील उदयपूर येथे काँग्रेसच्या तीन दिवसीय नवसंकल्प चिंतन शिबिराच्या (Congress Chintan Shivir) उद्घाटन सत्राला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकावर (Sonia Gandhi Attack Modi Government) निशाणा साधला. भाजप देशवासियांना भीतीच्या वातावरणात जगण्यास भाग पाडत आहे. अल्पसंख्याकावर अत्याचार केले जात आहे, अशा जोरदार घणाघात सोनिया गांधींनी केला.
हेही वाचा: काँग्रेस चिंतन शिबिर : २०२४ मध्ये सत्ता कशी मिळवायची? सोनिया गांधी करणार संबोधित
पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या 'कमाल शासन, किमान सरकार' या घोषणेचा नेमका अर्थ काय आहे, हे आतापर्यंत त्यांनी केलेल्या कार्यावरून दिसून आले आहे. देशात कायम ध्रुवीकरण करणे, लोकांना सतत भीती आणि असुरक्षिततेच्या वातावरणात जगण्यास भाग पाडणे, आपल्या समाजाचा अविभाज्य भाग असलेल्या आणि आपल्या प्रजासत्ताकाचे समान नागरिक असलेल्या अल्पसंख्याकांवर अत्याचार करणे हा याचा अर्थ आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या.
सोनिया गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगितले की, पक्ष आणि वैयक्तिक पातळीवर आपण सर्वांनी चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची हीच वेळ आहे. संघटनेत बदल ही काळाची गरज असून, आपल्या कामाची पद्धतही बदलण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. पक्षासाठी एकत्र काम करण्याचे आवाहनही सोनिया गांधी यांनी केले. आपण मोठ्या आणि एकत्रित प्रयत्नांनीच बदल घडवून आणू शकतो. आपल्याला वैयक्तिक आकांक्षा संघटनेच्या गरजेनुसार ठेवाव्या लागतील. पक्षाने खूप काही दिले आहे आणि आता पक्षाचे कर्ज फेडण्याची वेळ आली आहे. पुन्हा एकदा हिंमत दाखवण्याची गरज आहे. आपल्या पक्षात बदल होणे काळाची गरज आहे, असंही सोनिया गांधी म्हणाल्या. तसेच पक्षाच्या नेत्यांनी चिंतन शिबिरात आपली मतं मांडावी. पण, त्यामधून एक मजबूत पक्ष आणि एकतेचा संदेश देशाला गेला पाहिजे, असंही सोनिया गांधींनी नेत्यांना बजावलं.
Web Title: Congress Chintan Shivir Sonia Gandhi Attack On Pm Government Over Minorities
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..