VP Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपतींच्या भाषणावरून गोंधळ...शेतमालांना ‘एमएसपी’ लागू करण्याची काँग्रेसची मागणी
Congress Demands MSP for Crops : उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या भाषणावरून संसदीय गोंधळ उडाला, काँग्रेसने शेतमालांना किमान हमी भाव (एमएसपी) लागू करण्याची मागणी केली. विरोधकांनी सभात्याग करत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर जोरदार घोषणाबाजी केली.
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी मंगळवारी मुंबईतील एका कार्यक्रमात केलेल्या भाषणावरून आज काँग्रेस, आप व शिवसेनेच्या सदस्यांनी शेतमालाला किमान हमी भाव (एमएसपी) लागू करण्याची मागणी करीत राज्यसभेत घोषणा दिल्यानंतर सभात्याग केला.