
नवी दिल्ली : दिल्लीतील मद्यधोरणावर मांडण्यात आलेल्या कॅग अहवालावरून काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेतला. गैरव्यवहाराची व्यापक चौकशीसाठी लोकलेखा समिती स्थापन करावी व त्यात भाजप नेत्यांचा सहभाग शोधण्यासाठी चौकशीची व्याप्ती वाढवावी, अशी मागणी केली. सोबतच, ‘आप’ सरकारच्या कामगिरीवरील उर्वरित १३ कॅग अहवाल विधानसभेत मांडावेत, असेही आवाहन केले.