

Congress party headquarters in New Delhi amid the release of political donation figures for the 2025-26 financial year.
esakal
नवी दिल्ली,: काँग्रेस पक्षाला २० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या देणग्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नात २०२५-२६ या आर्थिक वर्षात जवळपास ७५ टक्क्यांनी घट झाली आहे. या आर्थिक वर्षात काँग्रेसला २० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या देणग्यांमधून १३०.६९ कोटी रुपयांवर आला आहे. निवडणूक आयोगाकडे पक्षाने सादर केलेल्या कागदपत्रांच्या विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे. दशकभरातील काँग्रेसला मिळणाऱ्या देणग्यांमधील ही सर्वांत मोठी घसरण आहे. काँग्रेसला २०२४-२५ या आर्थिक वर्षात अशा देणग्यांमधून ५१७.३९ कोटी रुपये मिळाले होते.