

New Delhi: चीनला लागून असलेल्या भारताच्या सीमोच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. अरुणाचल प्रदेशात चीनने भारतीय भूभागावर ताबा मिळवल्याचा दावा करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. मात्र, भारतीय लष्कराने या दाव्यांची पोलखोल करत संबंधित व्हिडीओ दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसवर निशाणा साधत, काँग्रेसने देशाची आणि भारतीय लष्कराची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी करत हल्लाबोल केला.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!