Loksabha 2019 : 'काँग्रेसला पंतप्रधानपद नाही मिळाले तरी चालेल'

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 मे 2019

एनडीए सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही, हेच आमचे लक्ष्य आहे. त्यासाठी आम्ही सर्व विरोधी पक्षांसमोर भूमिका स्पष्ट केलेली आहे. गरज पडली तर आम्ही पंतप्रधानपद सोडायलाही तयार आहोत. पण, एनडीए पुन्हा सत्तेत नको. 

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसला पंतप्रधानपद नाही मिळाले तरी चालेल, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वीच पंतप्रधानपदाबाबत चर्चा सुरू झाली आहे. अशातच काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आघाडीतील सर्व पक्षांची बैठक बोलवली आहे. सोनिया गांधी यांनी सर्वांना वैयक्तीक पत्र लिहले आहे. त्यापूर्वीच आझाद यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आझाद म्हणाले, की एनडीए सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही, हेच आमचे लक्ष्य आहे. त्यासाठी आम्ही सर्व विरोधी पक्षांसमोर भूमिका स्पष्ट केलेली आहे. गरज पडली तर आम्ही पंतप्रधानपद सोडायलाही तयार आहोत. पण, एनडीए पुन्हा सत्तेत नको. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress has no problem if it did not get Prime Ministers post says Ghulam Nabi Azad