Bharat Jodo: स्मृती इराणी होणार सामील? काँग्रेस पक्षाने पाठवले निमंत्रण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Jodo

Bharat Jodo: स्मृती इराणी होणार सामील? काँग्रेस पक्षाने पाठवले निमंत्रण

नवी दिल्ली - काँग्रेसच्या एका नेत्याने अमेठीच्या भाजप खासदार स्मृती इराणी यांना पत्र लिहून राज्यातील राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. कॉंग्रेसचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी एमएलसी दीपक सिंह म्हणाले की, त्यांनी बुधवारी इराणी यांचे सचिव नरेश शर्मा यांना गौरीगंज येथील त्यांच्या कॅम्प कार्यालयात आमंत्रण दिले होते.

हेही वाचा: NIA Raids : एनआयएकडून केरळमध्ये पीएफआयच्या 56 ठिकाणी छापेमारी; शस्त्र चालविण्याचे...

दीपक सिंह सांगितले की, कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रत्येकाला भारत जोडो यात्रेत सामील होण्यासाठी आमंत्रित करण्याचे निर्देश दिले होते. "मला वाटलं की अमेठीच्या खासदार स्मृती झुबिन इराणी यांना देखील आमंत्रण दिले पाहिजे, असं सिंह म्हणाले.

या निमंत्रणाबाबत विचारले असता भाजपचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश त्रिपाठी म्हणाले की, अमेठीचे खासदार किंवा अन्य कोणत्याही कार्यकर्त्याने भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दुर्गेश त्रिपाठी म्हणतात की, भाजप नेहमीच अखंड भारताच्या मार्गावर काम करते. भारत कधी तुटला नाही, त्यामुळे तो जोडण्याची मुद्दा कुठून आला हे मला माहीत नाही.

हेही वाचा: Heeraben Modi Demise : मुख्यमंत्री शिंदे गुजरातला जाणार; PM मोदींचं सांत्वन करणार

भारत जोडो यात्रा ३ जानेवारी रोजी गाझियाबादमार्गे उत्तर प्रदेशात प्रवेश करेल. भारत जोडो यात्रा 5 दिवस यूपीच्या सीमेवर असणार असून त्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटी विशेष तयारी करत आहे. प्रदेश कॉंग्रेसचे माध्यम समन्वयक ललन कुमार यांनी सांगितले की, पक्षाने उत्तर प्रदेशातील भारत जोडो यात्रेचा मार्ग जाहीर केला आहे, ज्याअंतर्गत ही यात्रा 3 जानेवारी रोजी गाझियाबादच्या लोणी भागातून उत्तर प्रदेशात प्रवेश करेल आणि त्या दिवशी लोणी तीरहा पर्यंत जाईल.

हेही वाचा जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक