Dhiraj Sahu : तीन डझन मशिन्स मोजतायत पैशांचा ढीग... आतापर्यंत 225 कोटी जप्त; भाजपचे काँग्रेस नेतृत्वावर गंभीर आरोप

congress jharkhand mp dhiraj prasad sahu over unaccounted cash recovery BJP demand fir
congress jharkhand mp dhiraj prasad sahu over unaccounted cash recovery BJP demand fir

झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या घरी बेहिशेबी रोकड सापडल्याचे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. ओडिशातील बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांविरोधात आयकर विभागाने सुरू केलेल्या छाप्यांमधून आतापर्यंत सुमारे 225 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. आज तकने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

आयकर विभागाच्या पथकाने बंटी साहू यांच्या घरातून पैशांच्या 19 बॅग्ज जप्त केल्या आहेत. या बंटी साहू यांच्याकडं दारू कारखान्यांच्या देखभालीसाठी नियुक्त करण्यात आलं होतं. सुदपारा जवळील एका घरावर छापा टाकून ही रक्कम जप्त करण्यात आली होती. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम 20 कोटींच्या पुढे जाऊ शकते. छापा मारला त्या ठिकाणाहून बँकेत देखील पैसे पोहोचवले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पैसे मोजण्यासाठी तीन डझन मशीन

आयकर विभागाकडून सापडलेल्या नोटांची मोजणी करण्यासाठी तीन डझन मशीन वापरल्या जात आहेत. या मशिन्सच्या मर्यादित क्षमतेमुळे नोटांची मोजणी संथ गतीने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ओडिशातील बोलांगीर जिल्ह्यातील डिस्टिलरी ग्रुपच्या आवारात लपवून ठेवलेली 200 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे, तर उर्वरित रक्कम ओडिशातील संबलपूर आणि सुंदरगड, झारखंडमधील बोकारो आणि रांची आणि कोलकाता या ठिकाणांहून जप्त करण्यात आली आहे.

धीरज प्रसाद साहू हे राजकारणातलं मोठं नाव आहे. धीरज साहू हे राज्यसभेचे तीन वेळा खासदार राहिले आहेत. याशिवाय चतरा लोकसभा मतदारसंघातून त्यांनी दोनवेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे, पण त्यांना यश आले नाही. 2009 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत धीरज साहू पहिल्यांदा राज्यसभेचे खासदार झाले. त्यानंतर 2010 मध्ये ते दुसऱ्यांदा आणि 2018 मध्ये तिसऱ्यांदा राज्यसभेवर पोहोचले.

congress jharkhand mp dhiraj prasad sahu over unaccounted cash recovery BJP demand fir
NIA Raids : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ठाणे, पुण्यासह NIAची देशभरात कारवाई; १० दहशतवाद्यांना घेतलं ताब्यात

धीरज साहू यांची घोषित संपत्ती किती?

2018 मध्ये राज्यसभेच्या निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात धीरजप्रसाद साहू यांनी 34 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. तसेच 2 कोटी 36 लाख रुपयांचे कर्ज जाहीर केले होते. 2016-17 च्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये त्यांनी आपले उत्पन्न एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे जाहीर केले होते.

काँग्रेसचे खासदार धीरज प्रसाद साहू यांचे कुटुंब दारू व्यवसायाशी संबंधित आहे. बलदेव साहू अँड ग्रुप ऑफ कंपनीज मूळची झारखंडमधील लोहरदगा जिल्ह्यातील आहे. या कंपनीने 40 वर्षांपूर्वी ओडिशात देशी दारू बनवण्यास सुरुवात केली. ही कंपनी बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड (बीडीपीएल) ची पार्टनरशिप फर्म आहे. या कंपनीचे मालक बलदेव साहू इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, क्वालिटी बॉटलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि किशोर प्रसाद विजय प्रसाद बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड आहेत.

congress jharkhand mp dhiraj prasad sahu over unaccounted cash recovery BJP demand fir
200 Crore Cash: काँग्रेसच्या खासदारावर 'इन्कम टॅक्स'ची धाड; सापडली 200 कोटींची कॅश; PM मोदींच्या ट्विटची चर्चा

भाजपचे काँग्रेसवर गंभीर आरोप

झारखंडमध्ये भाजपचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी धीरज साहू यांच्या अटकेची मागणी केली आहे. मरांडी यांनी या प्रकरणात साहूंविरोधात एफआयआर दाखल झाला पाहिजे तसेच त्यांना अटक देखील झाली पाहिजे असेही म्हटले आहे. तसेच त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची देखील मागणी केली आहे, तसेच काँग्रेसच्या नेचृत्वासोबत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी हे प्रकरण संबंधीत असल्याचे म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com