काँग्रेस नेते अहमद पटेल ICU मध्ये; मुलाने दिली माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 15 November 2020

काँग्रेसचे (Congress) वरिष्ठ नेते अहमद पटेल (Ahmed Patel) यांना गुडगावच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे

नवी दिल्ली- काँग्रेसचे (Congress) वरिष्ठ नेते अहमद पटेल (Ahmed Patel) यांना गुडगावच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रकृती बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये (ICU) ठेवण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली आहे. अहमद पटेल यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची (Coronavirus) लागण झाली होती. 71 वर्षीय अहमद पटेल यांनी 1 ऑक्टोबरला ट्विट केलं होतं की ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

अहमद पटेल यांचे पुत्र फैसल यांनी रविवारी ट्विट केले. आपल्या परिवारतर्फे मी सांगू इच्छितो की काही दिवसांपूर्वी अहमद पटेल कोरोनाने संक्रमित झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी गुडगावच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून ते सध्या आयसीयूमध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. त्यांच्या स्वस्थ आरोग्यासाठी प्रार्थना करा, असं फैसल ट्विटमध्ये म्हणाले आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी अहमद पटेल लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress leader Ahmed Patel in icu due to coronavirus