ब्रेकिंग: रोडरेज प्रकरणी नवज्योत सिंग सिद्धूला एक वर्षांचा तुरुंगवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navjot Singh Sidhu

रोडरेज प्रकरणी नवज्योत सिंग सिद्धूला एक वर्षांचा तुरुंगवास

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sindhu) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. 34 वर्षे जुन्या रोड रेज (Road Rage Case) प्रकरणी सिद्धूला एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापूर्वी सिद्धू यांनी रोड रेज प्रकरणी आपल्याविरुद्ध दाखल केलेली पुनर्विलोकन याचिका फेटाळण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला (Supreme Court) केली होती. सिद्धू यांनी पुनर्विलोकन याचिकेला उत्तर देताना सांगितले की, ही घटना 33 वर्षांपूर्वी घडली असून, याचिका कायम ठेवण्यायोग्य नाही. सिद्धू यांनी त्यांच्या स्वच्छ प्रतिष्ठेचा हवाला दिला होता. तसेच या खटल्यातील शिक्षेत बदल करू नये, अशी विनंतीही सर्वोच्च न्यायालयाला केली होती. (Navjot Singh Sindhu Get One Year Rigorous Imprisonment In Road Rage Case)

1988 चे प्रकरण

हे प्रकरण डिसेंबर 1988 चे आहे. पटियाला येथे कारने जात असताना सिद्धूने ज्येष्ठ नागरिक गुरनाम सिंग यांना धडक दिली होती. तसेच रागाच्या भरात सिद्धूने त्यांना धक्काबुक्कीदेखील केली त्यानंतर गुरनाम सिंह यांचा मृत्यू झाला होता. या सर्व घटनेनंतर पटियाला पोलिसांनी सिद्धू आणि त्याचा मित्र रुपिंदर सिंग यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. 1999 मध्ये ट्रायल कोर्टाने सिद्धूची निर्दोष मुक्तता केली होती, पण पंजाब हरियाणा हायकोर्टाने 2006 मध्ये सिद्धूला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. सिद्धू तेव्हा अमृतसरमधून भाजपचे खासदार होते. शिक्षेनंतर त्यांनी राजीनामा दिला होता. यानंतर सिद्धूने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

टॅग्स :navjot singh sidhu