esakal | सिद्धू यांचे प्रदेशाध्यक्षपद फिक्स? सोनिया गांधींची घेतली भेट
sakal

बोलून बातमी शोधा

Navjot Singh Sidhu

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट घेतली आहे. सोनिया गांधी यांच्या जनपथ रोडवरील निवासस्थानी सिद्धू भेटीसाठी गेले होते.

सिद्धू यांचे प्रदेशाध्यक्षपद फिक्स; सोनिया गांधींची घेतली भेट

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट घेतली आहे. सोनिया गांधी यांच्या जनपथ रोडवरील निवासस्थानी सिद्धू भेटीसाठी गेले होते. त्यांचे प्रदेशाध्यक्षपद फिक्स असल्याचे मानलं जात आहे. त्यामुळे पंजाब कॉंग्रेसमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेले अंतर्गत वाद आता मिटण्याच्या मार्गावर आहेत. पक्षातील नाराज नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर पंजाब प्रदेश कॉंग्रेसची धुरा येण्याची शक्यता आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वाद संपवण्याचा ‘फॉर्म्युला’ तयार झाला आहे. यानुसार राज्यातील प्रदेशाध्यक्ष सिद्धूकडे तर मुख्यमंत्रिपदी कॅप्टन अमरिंदरसिंग कायम राहतील. (Congress leader Navjot Singh Sidhu meet party interim president Sonia Gandhi)

पंजाबमधील फॉर्म्युलाची माहिती हरीश रावत यांनी दिली. पंजाब कॉंग्रेसचा पेच मिटविण्यासाठी हायकमांडने स्थापन केलेल्या समितीत हरिश रावत सदस्य आहेत. ते म्हणाले की, फॉर्म्युलानुसार दोन कार्यकारी अध्यक्ष देखील नेमण्याची तयारी केली जात असून त्यात राज्यातील सर्व घटक ,जात, धर्म आणि प्रांतास प्राधान्य दिले जाईल. नव्या सूत्रानुसार कॅप्टन अमरिंदर सिंग हे मुख्यमंत्रिपदी राहतील.

रावत म्हणाले की, अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांनी एकत्र राहणे गरजेचे आहे. पंजाबमध्ये आता कोणतेही मतभेद नाहीत. अलीकडेच सिद्धूने केलेल्या ट्विटबाबत हरिश रावत म्हणाले की, सिद्धू यांची मत मांडण्याची अनोखी शैली आहे. त्यांनी कौतुक केले तरी ती टीका वाटते. यात बदल करणे शक्य नाही. येत्या काही दिवसांत पंजाब कॉंग्रेस प्रदेश समितीच्या अध्यक्षाची घोषणा केली जाणार आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची सिंग यांनी भेट घेतली होती. तर सिद्धू यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांची भेट घेतली होती. कॅप्टन सिंग आणि सिद्धू यांनी पक्ष नेतृत्वाचा निर्णय मान्य राहील, असे मत मांडले आहे.

loading image