काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केली मोदींची स्तुती!

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

राज्यसभेवर महाराष्ट्रातून निवडून आलेले चिदंबरम हे मोदी सरकारच्या अर्थधोरमांचे कडवे टीकाकार आहेत. नोटबंदी व जीएसटीपासून यंदाच्या अर्थसंकल्पापर्यंत त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर कडाडून हल्ला चढविला आहे. नोटबंदीवरील त्यांच्या भाषमाला तर सरकार पक्षाकडे समर्पक उत्तरच नसल्याचे दिसून आले होते. त्याच चिदंबरम यांनी मोदींच्या भाषणाची स्तुती करण्यासाठी तीन ट्‌विटची "तिहाई' बांधणे लक्षणीय मानले जाते. 

नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री व भाजपचे कडवे विरोधक असलेले कायदेतज्ज्ञ पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणाची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे. विशेषतः पंतप्रधानांच्या भाषणातील तीन मुद्दे अतिशय दूरदृष्टीचे आहेत असा शब्दांत चिदंबरम यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. 

राज्यसभेवर महाराष्ट्रातून निवडून आलेले चिदंबरम हे मोदी सरकारच्या अर्थधोरमांचे कडवे टीकाकार आहेत. नोटबंदी व जीएसटीपासून यंदाच्या अर्थसंकल्पापर्यंत त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर कडाडून हल्ला चढविला आहे. नोटबंदीवरील त्यांच्या भाषमाला तर सरकार पक्षाकडे समर्पक उत्तरच नसल्याचे दिसून आले होते. त्याच चिदंबरम यांनी मोदींच्या भाषणाची स्तुती करण्यासाठी तीन ट्‌विटची "तिहाई' बांधणे लक्षणीय मानले जाते. 

चिदंबरम यांनी आज सकाळी सलग तीन ट्‌विट करत मोदींच्या भाषणाची स्तुती केली. या तीन घोषणांचे सर्वांनी स्वागत करायला पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी म्हटले की, लोकसंख्या विस्फोट रोखण्यासाठी व विकास साधण्यासाठी प्रत्येकाने कुटुंब छोटे ठेवणे हीदेखील देशभक्तीच आहे, संपत्ती निर्माण करणाऱ्या वर्गाबद्दल हीन भावाने नव्हे तर सन्मानाच्या भावनेने पाहणे तसेच प्लॅस्टीकच्या वापरावर बंदी या तीन घोषणा पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी यंदा केल्या. आम्ही सर्वांनी त्यांचे स्वागत केले पाहिजे. त्यांनी पुढच्या ट्‌विटमध्ये म्हटले की, पंतप्रधानांच्या या तीनही घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन व त्यांच्या कर अधिकाऱ्यांच्या फौजेने स्पष्ट पध्दतीने ऐकल्या असतील.

चिदंबरम यांचा विशेष रोख रोख संपत्ती निर्माण करणाऱ्यांना सन्मान देण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाकडे असल्याचे जाणकार मानतात. यातील पहिली व तिसरी उद्घओषणा ही तर जनआंदोलनच बनली पाहिजे शीही अपेक्षा चिदंबरम यांनी व्यक्त केली. यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था स्थानिक पातळीवरील आंदोलनांचे नेतृत्व करण्यासाठी तयार आहेत, असे सांगताना चिदंबरम यांनी आटोपशीर कटुंब व प्लॅस्टीकबंदीचा उल्लेख केला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader P Chidambaram praises PM Narendra Modi