esakal | पृथ्वीराज चव्हाणांचे मोदी सरकारला खुले आव्हान!
sakal

बोलून बातमी शोधा

पृथ्वीराज चव्हाणांचे मोदी सरकारला खुले आव्हान!

सध्या पी. चिदंबरम यांचे व्टिट चर्चेचा विषय बनला असून या व्टिटला अन्य नेत्यांकडून आणि जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी तर यूपीए विरुध्द एनडीए यांच्यात वादविवादाचे जणू खुले आव्हानच दिले आहे.

पृथ्वीराज चव्हाणांचे मोदी सरकारला खुले आव्हान!

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए (काँग्रेस-आघाडी) सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. सध्या पी. चिदंबरम यांचे व्टिट चर्चेचा विषय बनला आहे. या व्टिटला अन्य नेत्यांकडून आणि जनतेकडून प्रतिसाद मिळू लागला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी तर यूपीए विरुध्द एनडीए यांच्यात वादविवादाचे जणू खुले आव्हानच दिले आहे. 

पी. चिदंबरम यांनी आपल्या व्टिटमध्ये, डॉ. अरविंद सुब्रमण्यम यांनी २००४-२०१४ ला भारतीय अर्थव्यवस्थेचे 'तेजीचे वर्ष' म्हटले, ते मोदी सरकारचे सीईए (मुख्य आर्थिक सल्लागार) होते. तसेच डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी २००४-२०१४ चे 'हरवलेला दशक' असे वर्णन केले आहे. तेही मोदी सरकारचे विद्यमान सीईए आहेत. यावरुन मोदी सरकारच्या कामगिरीचा आपल्याला अंदाज आला असेल, असे सांगत त्यांनी २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीत आर्थिक वाढ घसरली असून सध्या २३.९ टक्के इतका आहे, त्यावर सध्याचे सीईए  डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम हे आनंदित असल्याची टिप्पणीही त्यांनी केली.

आता राज्यातील मराठा समाजाच्या नजरा पुन्हा उदयनराजेंकडे

यूपीएच्या काळात भारताचा आर्थिक विकास दर सर्वाधिक होता. नागरिकांना शिक्षण, अन्न सुरक्षा, जमीन व कामाची हमी असे कायदेशीर हक्क देण्यात आले. ज्याने कोट्यवधी लोकांना गरीबीतून मुक्त केले. यूपीएच्या दहा वर्षांच्या व एनडीएच्या 10 वर्षांवर (२०००-०४ आणि २०१४-२०) वादविवाद होऊ द्या, असे खुले आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्टिटच्या माध्यमातून दिले आहे. चव्हाणांचे हे आव्हान एनडीए सरकार स्वीकारणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.