राहुल गांधी महाराष्ट्रात प्रचाराला येणार नाहीत?

वृत्तसंस्था
Sunday, 6 October 2019

काँग्रेसने राहुल गांधींची स्टार प्रचारकांमध्ये समावेश केला असला तरी, अद्याप त्यांच्या महाराष्ट्र प्रचाराचा कोणताही कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळी उघड झाली आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियानात निवडणुका होत असताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी बँकॉकला गेल्याने अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या गटबाजीमुळे ते महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार नसल्याचेही बोलले जात आहे. 

महाराष्ट्र आणि हरियाना राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना राहुल गांधी बँकॉकला गेल्याचे समोर येत आहे. काँग्रेसच्या अडचणीच्या काळातच प्रमुख नेता सहलीवर जात असल्याने सोशल मीडियात त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. 

काँग्रेसने राहुल गांधींची स्टार प्रचारकांमध्ये समावेश केला असला तरी, अद्याप त्यांच्या महाराष्ट्र प्रचाराचा कोणताही कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळी उघड झाली आहे. तसेच नुकतेच अनेक काँग्रेस आमदारांनी भाजप, शिवसेनेत प्रवेश केला होता. नेत्यांवरील नाराजीमुळे ते प्रचार करणार नाहीत, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Rahul Gandhi may be not campaign in Maharashtra