
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज, पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर खरमरीत भाषेत टीका केली.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज, पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर खरमरीत भाषेत टीका केली. केंद्र सरकारला नव्या कृषी कायद्यांना मागे घ्यावेच लागेल, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं. देशातला शेतकरी पंतप्रधानांपेक्षा हुशार आहे, त्याला देशात काय चाललंय काय नाही, हे सगळं कळतं, असं मतही राहुल यांनी व्यक्त केलं.
काय म्हणाले राहुल गांधी?
कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील
शेतकऱ्यांना फसवता येणार नाही, दमवता येणार नाही
राहुल गांधी काय करतात हे शेतकऱ्यांना माहिती आहे
मी नरेंद्र मोदींना घाबरत नाही, कोणी मला हात लावू शकत नाही
काँग्रेसला शेतीमध्ये सुधारणा हवी आहे; पण शेती व्यवस्था उध्वस्थ करून नाही
पंतप्रधान मोदींना देशाची शेती काही मोजक्या लोकांच्या हातात द्यायची आहे.
राहुल गांधींनी विचारलेले प्रश्न
देशाची अर्थव्यवस्था Bestपासून Wrestकशी झाली?
शेतकऱ्यांच्या समस्यांच्यावेळी जे. पी. नड्डा कुठं होते?
जे. पी. नड्डा आहेत तरी कोण? ते माझे प्राध्यापक आहेत का?