Video:गमछा दाखवत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा; म्हणाले, 'कोणत्याही परिस्थितीत...'

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 14 February 2021

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी निवडणुकीचे राज्य आसाममध्ये पोहोचले आहेत.

दिसपूर- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी निवडणुकीचे राज्य आसाममध्ये पोहोचले आहेत. त्यांनी विधानसभा निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. राहुल गांधींनी शिवसागर जिल्ह्यातील शिवनगर बोर्डिंग फिल्डमध्ये रॅली घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे कौतुक केले तर भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे सीएए मुद्द्यावर भाष्य केलं. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

कोणत्याही परिस्थितीत सीएए लागू होणार नाही. राहुल गांधींनी त्यांच्या खांद्यावरील गमछा दाखवला, ज्यावर सीएए लिहिलं होतं आणि त्याच्यावर क्रॉस मारण्यात आला होता. ते म्हणाले की, हम दो हमारे दो लक्ष देऊन ऐका कोणत्याही परिस्थिती सीएए लागू होणार नाही. सीएए होणार नाही. राहुल गांधी पुढे म्हणाले की, कोणतीही ताकद आसामला तोडू शकणार नाही. जो कोणी आसामला तोडू पाहील किंवा राज्यात द्वेष पसरवू पाहील, त्यांना आसामचे लोक धडा शिकवतील. रॅलीदरम्यान काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी सीएए क्रॉस केलेला गमछा घातला होता. 

राहुल गांधी म्हणाले की, आसामच्या मजुरांना मजुरीसाठी केवळ 167 रुपये मिळतात आणि गुजरातच्या व्यावसायिकांना टी गार्डन दिले जाते. मोदींना माहितेय की आसामला तोडूनच त्यांना येथे चोरी करता येईल. देशाला फक्त दोन लोक चालवत आहेत. हम दो हमारे दो... बाकी सब मर लो...आसामचे सबकुछ लो.  त्यांना माहितेय की आसाममध्ये आग लावली तरच त्यांचं कार्य साध्य होऊ शकतं. बजेटमध्ये शेतकऱ्यांना काहीही देण्यात आलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Rahul Gandhi Sivasagar Assam caa bjp modi