Video:राहुल गांधी म्हणतात, 'आरक्षण कधीच बंद करू देणार नाही'

टीम ई-सकाळ
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी ही आरक्षण विरोधी आहे. त्यांना मागासवर्गीय, आदिवासींची प्रगती नको आहे.

नवी दिल्ली : देशातील आरक्षण व्यवस्थेवर आज, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. देशात कधीही आरक्षण बंद करू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी देशातील दलित, ओबीसी आणि आदिवासींना दिली आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी ही आरक्षण विरोधी असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय म्हणाले राहुल गांधी?
या संदर्भात एएनआयने ट्विट केले आहे. त्यात राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी ही आरक्षण विरोधी आहे. त्यांना मागासवर्गीय, आदिवासींची प्रगती नको आहे. ते संविधानात्मक चौकट मोडत आहेत. मी मागासवर्गीय, दलित, ओबीसी सगळ्यांना आश्वासन देतो की, कधी आरक्षण संपुष्टात येणार नाही. मोदी आणि मोहन भागवत यांनी कितीही स्वप्न पाहिलं तरी ते शक्य होणार नाही. आरक्षण हा घटनात्मक अधिकार आहे. भाजप सरकार त्याविरोधात सुप्रीम कोर्टात मत व्यक्त करत आहे. हिंदुस्तान एक सक्षम देश होण्यासाठी मागासवर्गीयांना प्रचंड संघर्ष आणि त्यागानंतर हा अधिकार मिळाला आहे. आज, एका पाठोपाठ एकाचे अधिकार काढून घेण्याचा कट रचला आहे. यापेक्षा मोठा देशद्रोह काय असेल.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader rahul gandhi statement about reservation bjp rss narendra modi mohan bhagwat